आकाश म्‍हणजे शब्‍दगुण आणि मूर्त द्रव्‍यांचा अवकाश !

‘आकाश म्‍हणजे काय ? अवकाश म्‍हणजे आकाश ना ? ‘शब्‍दगुणमाकाशम् ।’ म्‍हणजे ‘शब्‍द हा आकाशाचा गुण आहे.’ जेथे शब्‍द उत्‍पन्‍न होऊ शकतो, अशी जी हवेची पोकळी तिला ‘आकाश’ म्‍हणतात.

‘आकाश हे पंचभूतातील पहिले तत्त्व आहे. आकाशाचे २ पैलू आहेत. अवकाश आणि शब्‍द (नाद) विश्‍वातील यच्‍चयावत् पदार्थाचे विश्‍लेषण केले, तर ‘नादलहरीमय’ तत्त्व आढळते’, असे आजचे विज्ञान सांगतेच. तेच आकाश आमच्‍या दर्शनातील पहिले महाभूत आहे. आकाश हे मूर्तद्रव्‍य आहे. entity (स्‍वतंत्र अस्‍तित्‍व) आहे. ‘आकाशो नाम शब्‍दगुणः अवकाशकरो मूर्तद्रव्‍याणाम् ।’ म्‍हणजे ‘आकाश म्‍हणजे शब्‍दगुण आणि मूर्त द्रव्‍यांचा अवकाश होय.’ शब्‍द (नाद) हाच सारभूत ! जगाच्‍या निर्मितीमध्‍ये शब्‍दाचा भाग पहिला.’

(साभार : मासिक, ‘घनगर्जित’, मे २०२२)