महाराष्‍ट्रातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्‍या उत्तरायण किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व !

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवी ही महाराष्‍ट्रातील प्रमुख साडेतीन शक्‍तीपिठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्‍तीपीठ आहे. प्रत्‍येक वर्षी ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी या तीन दिवसांमध्‍ये देवीचा उत्तरायण किरणोत्‍सव असतो. तसेच दक्षिणायणात ९, १० आणि ११ नोव्‍हेंबर या तीन दिवसांमध्‍ये देवीचा दक्षिणायण किरणोत्‍सव होतो. या सोहळ्‍याच्‍या वेळी मावळतीची सूर्यकिरण महाद्वारातून अंबाबाईच्‍या (श्री महालक्ष्मीच्‍या) मंदिरात प्रवेश करून प्रथम दिवशी तिचे चरण, दुसर्‍या दिवशी तिचे पोट आणि तिसर्‍या दिवशी तिचे मुख अन् तद़्‍नंतर संपूर्ण मूर्ती यांना स्‍पर्श करतात. सूर्यकिरणांनी देवीच्‍या मूर्तीला स्‍पर्श करण्‍याच्‍या आधी सर्व विद्युत् दीप मालवून मंदिराच्‍या गाभार्‍यात केवळ दोन समया तेवत ठेवल्‍या जातात. किरणोत्‍सव झाल्‍यानंतर देवीची कर्पूरारती, तसेच देवळात घंटानाद केला जातो. वर्षातून दोन वेळा होणार्‍या या किरणोत्‍सवाचे आध्‍यात्मिक महत्त्व येथे लेखबद्ध केले आहे.

१. सूर्याच्‍या किरणांमुळे मूर्तीतील मूलतत्त्वाची जागृती होणे

सूर्यप्रकाश आणि सौर ऊर्जा अत्‍यंत सात्त्विक असते. त्‍यामुळे जेव्‍हा सूर्याचे किरण श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मूर्तीवर पडतात, तेव्‍हा सूर्यकिरणांच्‍या रूपाने साक्षात् सूर्यदेवच प्रथम देवीच्‍या चरणांना वंदन करतो. तेव्‍हा सूर्यदेवाचा भाव पाहून श्री महालक्ष्मीदेवी त्‍याच्‍यावर प्रसन्‍न होऊन त्‍याला आणि तिच्‍या मूर्तीवर सूर्यकिरण पडण्‍याची अनुमती देते. त्‍यामुळे जेव्‍हा सूर्यप्रकाश आणि सौर ऊर्जा देवीच्‍या मूर्तीवर पडतात, तेव्‍हा देवीची मूर्ती सूर्यकिरणांच्‍या रूपात चैतन्‍याने भारित झालेले शुद्धस्‍वरूपातील तेजतत्त्व ग्रहण करते. त्‍यामुळे कलियुगातील रज-तम प्रधान वायूमंडलामुळे दूषित झालेल्‍या देवीच्‍या मूर्तीवर आलेले पारदर्शक आणि विरळ स्‍वरूपाचे त्रासदायक शक्‍तीचे आवरण दूर होऊन सौरऊर्जा अन् सूर्यप्रकाश देवीच्‍या मूर्तीद्वारे पूर्णपणे ग्रहण केले जातात. त्‍यामुळे देवीच्‍या मूर्तीतील सुप्‍त शक्‍ती जागृत होऊन कार्यरत होते. याला ‘सूर्याच्‍या किरणांमुळे मूर्तीतील मूलतत्त्वाची जागृती होणे’, असे म्‍हणतात.

२. श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्‍सव चालू असतांना देवीच्‍या मूर्तीच्‍या विविध अवयवांवर सूर्यकिरण पडल्‍यामुळे होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया

३. श्री महालक्ष्मीदेवीच्‍या किरणोत्‍सवामुळे होणारे लाभ

३ अ. देवीच्‍या मूर्तीला होणारा लाभ : देवीच्‍या मूर्तीवरील पारदर्शक आवरण दूर होऊन तत्त्वजागृती होते.

३ आ. देवीच्‍या मंदिराला होणारा लाभ : देवीच्‍या मंदिराभोवती सौरऊर्जा कार्यरत झाल्‍यामुळे मंदिराभोवती सूर्यकवच निर्माण होते.

३ इ. देवीच्‍या भाविकांना होणारा लाभ : देवीचे भावपूर्ण दर्शन घेणार्‍या भाविकांना किरणोत्‍सव पाहिल्‍यावर अधिक प्रमाणात चैतन्‍य आणि आनंद मिळून आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ होतो.

४. किरणोत्‍सवामुळे देवीच्‍या मूर्तीमध्‍ये मूलतत्त्वाची जागृती होऊन त्‍याचा लाभ समष्‍टीला होणे

देवीच्‍या मूर्तीतील पंचतत्त्वांची शुद्धी होऊन देवीचे मूलतत्त्व जागृत होते. त्‍यामुळे देवीच्‍या मूर्तीकडे ब्रह्मांडातील देवीलोकातून पृथ्‍वीकडे (भूलोकाकडे) येणारा देवी तत्त्वाचा ओघ अधिक प्रमाणात आकृष्‍ट होतो. त्‍यामुळे देवीची मूर्ती देवीतत्त्वाने पूर्णपणे भारित होऊन तिचे तत्त्व शक्‍ती, भाव, चैतन्‍य, आनंद आणि शांती या घटकांच्‍या लहरींच्‍या रूपाने वायूमंडलात प्रक्षेपित होऊन संपूर्ण वायूमंडलाची अल्‍पावधीत शुद्धी होते. अशा प्रकारे उत्तरायणातील किरणोत्‍सवामुळे देवीच्‍या मूर्तीमध्‍ये जागृत झालेले तत्त्व पुढील ६ मास टिकून रहाते. त्‍यानंतर दक्षिणायणातील किरणोत्‍सवामुळे देवीच्‍या मूर्तीमध्‍ये जागृत झालेले तत्त्व पुढील ६ मास टिकून रहाते. अशा प्रकारे देवीचे दर्शन घेण्‍यासाठी येणार्‍या भाविकांना देवीच्‍या जागृत तत्त्वाचा लाभ संपूर्ण वर्षभर होतो.

५. श्री महालक्ष्मीदेवीच्‍या किरणोत्‍सवामुळे विविध स्‍तरांवर झालेले आध्‍यात्मिक लाभ

६. किरणोत्‍सवाच्‍या आधी आणि नंतर केलेल्‍या धार्मिक कृतींमागील अध्‍यात्‍मशास्‍त्र

सूर्यकिरणांनी देवीच्‍या मूर्तीला स्‍पर्श करण्‍याच्‍या आधी सर्व विद्युत् दीप मालवून मंदिराच्‍या गाभार्‍यात केवळ दोन समया तेवत ठेवल्‍या जातात. किरणोत्‍सव झाल्‍यानंतर देवीची कर्पूरारती तसेच देवळात घंटानाद केला जातो. वरील कृतींचे आध्‍यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

टीप – ब्रह्मनाडी : ब्रह्मनाडी ही सुषुम्‍नानाडीपेक्षाही सूक्ष्मतम असते. ती ब्रह्मरंध्राशी निगडित असून ती जागृत झाल्‍यावर व्‍यक्‍तीची कुंडलिनीशक्‍ती वैश्‍विक किंवा वैश्‍वानर नाडीशी जोडली जाते. ही नाडी मनुष्‍यामध्‍ये ७० टक्‍के पातळीनंतर म्‍हणजे संतपद प्राप्‍त केल्‍यावर जागृत होते. देवतांचे तत्त्व निर्गुण आणि सूक्ष्मतम असते, तर त्‍यांच्‍या मूर्तीमध्‍ये त्‍यांचे सगुण-निर्गुण किंवा निर्गुण-सगुण स्‍तरावरील तत्त्व कार्यरत असते. त्‍यामुळे देवतांच्‍या मूर्तीमध्‍ये जेव्‍हा त्‍यांचे मूलतत्त्व जागृत होते, तेव्‍हा देवतांची ब्रह्मनाडी कार्यरत होऊन ती वैश्‍विक किंवा वैश्‍वानरनाडीशी जोडली जाते.

– कु. मधुरा भोसले (आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१.२०२३)

कृतज्ञता

कु. मधुरा भोसले

श्री महालक्ष्मीदेवीच्‍या कृपेमुळेच तिच्‍या किरणोत्‍सवामुळे आध्‍यात्मिक स्‍तरावर घडणारी सूक्ष्मातील प्रक्रिया आणि तिचे आध्‍यात्मिक महत्त्व लक्षात आले’, यासाठी मी देवीच्‍या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे. अंबाबाईची कृपा आम्‍हावर अशीच होत राहू दे आणि तिच्‍या कृपाशीर्वादाने भूतलावर लवकरात लवकर हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होऊ दे’, अशी तिच्‍या पावन चरणी आर्त प्रार्थना आहे.’ – कु. मधुरा भोसले