दुबईमधील एका जिल्ह्याचे ‘हिंद सिटी’ असे नामकरण

शेख महंमद बिन रशीद अल् मकतूम

दुबई – येथील ‘अल् मिन्हाद’ या जिल्ह्याचे आणि त्याच्या शेजारील परिसराचे नाव पालटून ‘हिंद सिटी’ असे ठेवण्यात आल्याची घोषणा उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि राजे असणारे शेख महंमद बिन रशीद अल् मकतूम यांनी केली. हा जिल्हा ४ सेक्टरमध्ये विभागला गेलेला आहे. याला अनुक्रमे हिंद १, हिंद २, हिंद ३ आणि हिंद ४ अशी नावे देण्यात आली आहेत.

‘हिंद’ शब्दाचा अरबी अर्थ

‘हिंद’ शब्दाचा अरबी भाषेतील अर्थ ‘१० उंटांचा कळप’, असा होतो. तसेच ‘हिंद’ असे मुलींचे नावही ठेवले जाते. उपराष्ट्रपती शेख मकतूम यांच्या पत्नीचेही नाव हिंद आहे. त्यांचे पूर्ण नाव शेख हिंद बिंत मकतूम बिन जुमा अल् मकतूम असे आहे.