विश्रांतवाडी (पुणे) येथे ‘महिलांची असुरक्षितता, लव्ह जिहाद आणि त्यावरील उपाय’ या व्याख्यानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

महिलांना मार्गदर्शन करतांना कु. क्रांती पेटकर

पुणे – विश्रांतवाडी येथे सौ. चंद्रलेखा धुरी यांच्या बचतगटातील महिलांसाठी २७ जानेवारी या दिवशी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये ‘महिलांची असुरक्षितता, लव्ह जिहादचे संकट आणि त्यावरील उपाय’, या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी याविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ ११६ महिलांनी घेतला.

वैशिष्ट्यपूर्ण

१. विश्रांतवाडी येथील सौ. चंद्रलेखा धुरी यांनी त्यांच्या संपर्कातील १२ बचतगटातील महिलांपर्यंत विषय पोचावा, तसेच त्या जागृत व्हाव्यात, यांसाठी पुढाकार घेऊन सर्वांना एकत्र केले होते.

२. व्याख्यानानंतर एका जिज्ञासू महिलेने उत्स्फूर्तपणे सांगितले, ‘‘तुम्ही आम्हाला जी माहिती दिली, त्याविषयी आम्हाला काहीच ठाऊक नव्हते. या व्याख्यानामुळे आमचे डोळे उघडले.’’ हे सांगत असतांना त्यांना अश्रू अनावर झाले.