युवकांनी थोर राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवावा ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

धनबाद (झारखंड) येथील सरस्वती शिशु मंदिर शाळेतील प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

सरस्वती शिशु मंदिर शाळेतील प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात संबोधित करतांना समितीचे श्री. शंभू गवारे

धनबाद (झारखंड) – देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्यानंतरही आपल्याला विविध समस्यांशी लढावे लागत आहे; कारण आपले आदर्श पालटले आहेत. युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई, भगतसिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श ठेवून प्रयत्न केले, तर वैयक्तिक उन्नती समवेत राष्ट्राचीही उन्नती होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वाेत्तर समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी केले.

येथील सरस्वती शिशु मंदिरामध्ये आयोजित प्रजासत्ताकदिनाच्या म्हणजेच २६ जानेवारी या दिवशीच्या कार्यक्रमात केले.