सातारा, २० जानेवारी (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरही होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक मंदिरे अन् मशिदी यांचीही उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांनी कधीही कुठल्याही धर्माचा अनादर केला नाही. त्यांनी त्या काळात अनेक मंदिरे अन् मशिदी बांधल्या. यावरून कुणीही कुठलाही वाद करू नये. दोघेही स्वराज्यरक्षक होते. त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला; म्हणून ते धर्मरक्षकही होते, असे मत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीमाध्यमांकडे व्यक्त केले.