आझमगड (उत्तरप्रदेश) येथे बुरख्याच्या आडून कारागृहातील बंदीवानांना गांजा पुरवणार्‍या ४ मुसलमान महिलांना अटक

आझमगड (उत्तरप्रदेश) – येथे पोलिसांनी बुरख्याच्या आडून गांजा पुरवणार्‍या ४ मुसलमान महिलांना पोलिसांनी अटक केली. शबनम, मदिना, शहनाज आणि शबाना अशी त्यांची नावे आहेत. त्या महिला बुरख्याच्या वेशात बंदीवानांना भेटायच्या आणि वाटेल त्या किमतीत गांजा पुरवायच्या. त्यांच्याकडून ४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांच्या अन्वेषणात आरोपी महिलांनी सांगितले की, बंदीवानांना भेटण्याच्या बहाण्याने त्या बंदीवानांच्या मागणीनुसार त्यांना गांजा पुरवत होत्या. नुकत्याच त्या गांजा पुरवण्यासाठी कारागृहाजवळ पोचल्या असता पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी बुरख्यात गांजा लपवून ठेवल्याचे आढळून आले. चार महिलांकडून ४ किलो गांजा जप्त करण्यात आला. उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा प्रविष्ट केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

गुन्हेगारी केवळ मुसलमान पुरुषच नव्हे, तर महिलाही पुढे असतात, हे दर्शवणारी घटना !