ब्रिटनमध्ये ‘रेनबो’ (इंद्रधनुष्य) शेजार्‍याच्या संख्येत होत आहे वाढ !

(‘रेनबो’ शेजारी म्हणजे वेगवेगळ्या जाती-धर्मांचे लोक एकमेकांच्या शेजारी रहाणे)

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये नवीन सामाजिक पालट दिसू लागला आहे. येथील शेजारी वेगवेगळ्या देशातील आणि धर्मांतील आहेत. उदारणार्थ एका घरात श्‍वेतवर्णीय कुटुंब रहात आहे, तर दुसर्‍यात कृष्णवर्णीय आणि तिसर्‍यात आशियाई कुटुंब रहात आहे. अशा शेजार्‍यांना ‘इंद्रधनुष्य’ म्हणजे रेनबो’ असे नाव दिले आहे. ते अल्पसंख्य असले, तरी एकत्र आल्याने बहुसंख्य झाले आहेत. यामुळे त्यांना ‘मायनॉरिटी-मेजॉरिटी’ म्हणजे (अल्पसंख्यांक असलेले बहुसंख्यांक) असे संबोधले जात आहे. यामुळे समुदायांत प्रेम भावना वाढली आहे. मागील २० वर्षांत श्‍वेतवर्णीय ब्रिटिशांच्या लोकसंख्येत ११ लाखांची घट, अन्य लोकांच्या संख्येत ८७ लाखांची वाढ झाली आहे.

एका संशोधनानुसार, कार्यालयात भिन्न संस्कृतीच्या लोकांनी एकत्र काम केल्यास ३५ टक्के अधिक नफा कमावला जाऊ शकतो. हा २ सहस्र ४०० आस्थापनांवरील संशोधनातून काढलेला निष्कर्ष आहे.