प्रेमभाव असल्‍याने सतत इतरांचा विचार करू शकणार्‍या रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या श्रीमती भारती पालन (वय ६५ वर्षे) !

१. प्रेमभाव

श्रीमती भारती पालन

‘श्रीमती भारती पालनताई पुष्‍कळ प्रेमळ आहेत. आम्‍ही ३ – ४ साधिका धान्‍य निवडण्‍याची सेवा चालू असते, तेथे ‘राईस रोटी’ (कुरकुरीत डोसे, अल्‍पाहाराचा एक प्रकार) निवडत असतो. तेव्‍हा पालनताई आमच्‍या समवेत असतात. मी ‘राईस रोटी’च्‍या पाकिटातील शेवटचा चुरा चाळण्‍याची सेवा करते. तेव्‍हा ताई थोड्या थोड्या वेळाने मला विचारतात, ‘‘माई, तुमचे हात दुखत नाहीत ना ? दुखत असतील, तर मला सांगा हं. मी थोडे चाळते.’’ तेव्‍हा ‘ताईंच्‍या माध्‍यमातून साक्षात् भगवंताने मला साहाय्‍याचा हात पुढे केला आहे’, असे मला जाणवते.

२. इतरांचा विचार करणे

श्रीमती अनिता कोनेकर

मी त्‍यांच्‍या समोरून धान्‍य निवडलेली पिशवी वजन करण्‍याकरता ओढत नेत असतांना त्‍या मला म्‍हणतात, ‘‘माई थांबा, मी तुम्‍हाला साहाय्‍य करते. एवढी जड पिशवी तुम्‍ही एकट्याने नेऊ नका.’’ यावरून ‘त्‍या सहसाधकाची काळजी घेतात’, हे लक्षात येते.

पालनताईंची उत्तरोत्तर प्रगती होवो, अशी ईश्‍वर चरणी प्रार्थना करतेे. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कोमल चरणी, तसेच श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता व्‍यक्‍त करते.’

– श्रीमती अनिता आत्‍माराम कोनेकर (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ७१ वर्षे ) (९.११.२०२२)