गडचिरोली पोलिसांनी २० ते २५ नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळळा !

गडचिरोली – भूमकाल सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने २० ते २५ नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला. नक्षलविरोधी अभियानाच्या काळात अहेरी तालुक्यातील पेरमीली सीमेत येणार्‍या वेडमपल्ली परिसरात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात चकमक झाली. चकमक झालेल्या ठिकाणाहून शस्त्रांसह मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले.

संपादकीय भूमिका 

नक्षलवादाचे समूळ उच्चाटन होऊ न शकणे, हे स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !