रामसेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याच्या याचिकेवर फेब्रुवारीमध्ये सुनावणी

केंद्र सरकारने अद्यापही सर्वोच्च न्यायालयात याविषयी प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याची डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची माहिती

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – रामसेतूला ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करण्याच्या डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्या याचिकेवर फेब्रुवारी मासाच्या दुसर्‍या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने ‘सध्या याविषयी घटनापिठामध्ये सुनावणी चालू असल्याने यावर तात्काळ सुनावणी करता येणार नाहीे’, असे स्पष्ट केले.

भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी न्यायालयात सांगितले की, ‘सॉलिसिटर जनरल’ तुषार मेहता यांनी १२ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचे यापूर्वी सांगितले होते; मात्र अद्यापही त्यांनी ते सादर केलेले नाही. पूर्वी म्हटले होते की, सरकारचे याविषयीचे उत्तर सिद्ध (तयार) आहे.

यावर ‘सॉलिसिटर जनरल’ तुषार मेहता म्हणाले की, या मागणीविषयी सरकार विचार करत आहे. त्यामुळे न्यायालयाने या याचिकेवर फेब्रुवारीमध्ये सुनावणी करावी.