(म्हणे) ‘मी राहुल गांधी यांना मारून टाकले आहे !’ – राहुल गांधी यांचे स्वतःविषयीच निरर्थक विधान

नवी देहली – आपण ज्या व्यक्तीला पहात आहात, तो राहुल गांधी नाही. तुम्ही त्याला पाहू शकता; पण समजू शकत नाही. हिंदु धर्मग्रंथ वाचा, भगवान शिवाविषयी वाचा तेव्हा तुम्हाला समजू शकेल. राहुल गांधी तुमच्या आणि भाजपच्या डोक्यात आहे; पण मी राहुल गांधी याला मारून टाकले आहे. मला माझ्या प्रतिमेशी देणेघेणे नाही. प्रतिमेविषयी मला कोणताही रस नाही. तुम्ही मला चांगले किंवा वाईट म्हणू शकता, असे उत्तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या वेळी हरियाणामध्ये एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नावर दिले. या यात्रेद्वारे ‘राहुल गांधी यांची प्रतिमा किती सुधारली ?’ असा प्रश्‍न या पत्रकाराने विचारला होता. ‘भारत जोडो’ यात्रेसंबंधी माझा उल्लेख होऊ नये,’ असेही राहुल गांधी या वेळी म्हणाले.

संपादकीय भूमिका 

अशा प्रकारची निरर्थक विधाने करणार्‍या राहुल गांधी यांना भारतातील जनता किती गांभीर्याने घेते हे संपूर्ण जगाला ठाऊक झाले आहे, हे राहुल गांधी यांना कधी कळणार ?