कोलकाता – ‘वन्दे भारत’ एक्सप्रवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. बंगालमध्ये आठवड्याभरात या रेल्वेगाडीवर दगडफक करण्याची ही तिसरी घटना आहे. बारोसई रेल्वे स्थानकाजवळ ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसच्या सीसी-१४ डब्यावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या. या घटनेमुळे गाडी बोलपूर स्थानकात बराच वेळ रेल्वेगाडी थांबवावी लागली. सुदैवाने या दगडफेकीत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. ३० डिसेंबर २०२२ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये ‘वन्दे भारत’ रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर २ जानेवारीच्या रात्री मालदा येथे या रोल्वेगाडीवर दगडफेक करण्यात आली. यानंतर ३ जानेवारीला किशनगंज येथे या रेल्वेगाडीवर दगडफेक झाली. बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांनी या घटनेची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे चौकशी करण्याची मागणी केली होती.
Bengal: #VandeBharat Express pelted with stone again, train operations disrupted.#ITVideo pic.twitter.com/SXn58VHjoF
— IndiaToday (@IndiaToday) January 9, 2023
संपादकीय भूमिकासमाजकंटकांकडून वारंवार रेल्वेगाड्यांवर दगडफेक केली जात असतांना कारवाई न करणारे तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील पोलीस ! राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यामुळे आता जनतेला रेल्वेगाडीने प्रवास करणेही किती अवघड झाले आहे, हेच यातून दिसून येते ! |