बलरामपूर (उत्तरप्रदेश) – बलरामपूर जिल्ह्यात धर्मांतराशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आले आहे. जलालुद्दीन याने त्याच्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी रोजंदारीवर काम करणार्या हिंदु कामगारांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला आणि त्यांना पैशांचे आमीष दाखवले, असा आरोप या रुग्णालयाचा कंत्राटदार वसीउद्दीन याच्या पत्नीने केला आहे.
१. या महिलेने तक्रारीत म्हटले आहे, ‘माझा पती कंत्राटदार आहे. त्याने जलालुद्दीन उभारत असलेल्या रुग्णालयाच्या बांधकामासाठी रोजंदारीवर कामगार पुरवले होते. जलालुद्दीन याने त्या कामगारांवर धर्मांतरासाठी दबाव टाकला. तेव्हा मी जलालुद्दीन याला ‘कामगारांवर धर्मांतरासाठी दबाव आणू नका’, असे सांगितल्यावर पतीच्या कामाचे कोट्यवधी रुपये त्याने अडकवून ठेवले आणि त्यांना कारागृहात पाठवण्याची धमकी दिली.’
२. या प्रकरणी कंत्राटदार वसीउद्दीन यांच्या पत्नीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मानवाधिकार आयोग आणि महिला आयोग यांना पत्र पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे.