हिंदुत्वासाठी दिशादर्शक ठरलेली जळगाव येथील अभूतपूर्व हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

१८ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !

मागील २ मासांपासून जळगाव शहर आणि आसपासच्या गावांमध्ये केवळ एकच चर्चा होती, ती म्हणजे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शिवतीर्थावरील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !’ येथील पुरोगामी आणि धर्मांध संघटना यांनी सभा होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेही; मात्र २५ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला १८ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी हिंदूंनी उपस्थित राहून ‘हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज कोणत्याही विरोधाने बंद होणार नाही, जर विरोध केला, तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणारच’, अशी शपथ घेतली. सभेला सहस्रो हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी कृतीप्रवण होण्याचा निर्धार केला. जळगाव जिल्ह्यातील हिंदूंवरील आघातांना वाचा फोडण्यासाठी सभा महत्त्वपूर्ण ठरली.

वीरश्री निर्माण करणार्‍या राष्ट्र-जागृती सभेचा वृत्तांत आमच्या वाचकांपर्यंत पोचावा, यासाठी आजचा अंक आम्ही ‘जळगाव हिंदु राष्ट्र-जागृती सभा विशेष’ म्हणून प्रसिद्ध करत आहोत. सहस्रावधी हिंदूंचे व्यापक संघटन हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साहाय्यक ठरावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना !

हिंदुत्वाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणार्‍यांना चोख प्रत्युत्तर देत जळगाव येथील सभेला १८ सहस्रांहून अधिक हिंदू एकवटले !

यापुढे ‘खानदेश’ नाही, तर अभिमानाने ‘कान्हादेश’ म्हणा ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन’ न्यूज चॅनेल

श्री. सुरेश चव्हाणके

हा ‘कान्हादेश’ आहे, याचे २० दाखले माझ्याकडे आहेत. येथे यादव कुळातील राजाचे राज्य होते. हा कान्हाचा म्हणजे धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाचा देश आहे, कोणत्या खानाचा प्रदेश नाही. येथील उत्खननातही हिंदूंच्या अस्तित्वाचे पुरावे प्राप्त झाले आहेत. अश्मयुगाच्या ४० सहस्र वर्षांपूर्वीपासून हिंदूंच्या अस्तित्वाचे पुरावे येथे आहेत. इस्लाम पंथ केवळ १ सहस्र ४०० वर्षांचा आहे. त्यामुळे यापुढे ‘खानदेश’ नव्हे, तर अभिमानाने ‘कान्हादेश’ म्हणा, असे आवाहन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.

१. भारतातील हिंदू भगव्याचा अपमान सहन करणार नाहीत. ‘पठाण’ चित्रपटात अर्धनग्न नारीला भगव्या वस्त्रात दाखवले आहे. हा तोच रंग आहे, ज्याचा ध्वज महाभारतात श्रीकृष्णाच्या रथावर होता, जो छत्रपती शिवरायांनी रायगडावर फडकवला. भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणार्‍या ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घाला.

२. यावल-रावेर परिसरात मोठ्या प्रमाणात गोतस्करी होत आहे. गोरक्षकांवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत आहेत. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे शासन असून काय उपयोग ?

३. खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हिंदु युवतींची फसवणूक करणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात महाराष्ट्रातच नव्हे, तर केंद्रामध्ये कठोर कायदा करायला हवा.

जळगाव जिल्ह्यातील अवैध पशूवधगृहे बंद न केल्यास हिंदू सनदशीर मार्गाने जनआंदोलन उभारतील ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

जळगाव जिल्ह्यातील सावदा आणि यावल या परिसरांमध्ये गोतस्करी, गोहत्या होत आहेत. जळगावमध्ये अवैधपणे पशूवधगृहे चालू आहेत. गोहत्यारे मोकाट आहेत आणि गोरक्षकांवर आक्रमण होत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी गावागावांत आंदोलने व्हायला हवीत. जनआंदोलन उभे रहाण्यापूर्वीच प्रशासनाने अवैध पशूवधगृहे बंद करावीत, अन्यथा हिंदू बांधव त्याविरोधात रस्त्यावर उतरून सनदशीर मार्गाने जनआंदोलन उभारतील.

१. जळगावमध्ये चालू असलेला ‘जिम जिहाद’ रोखायला हवा. येथील जिममधील (व्यायामशाळेमधील) काही प्रशिक्षक धर्मांध आहेत, तर तेथे जाणार्‍या सर्वच युवती आणि महिला हिंदु आहेत.

२. वक्फ कायद्याच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील सावदा, चोपडा, तसेच नाशिक जिल्ह्यातील निफाड यांसह अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाने भूमींवर दावा लावला आहे. यातून एकप्रकारे ‘लँड जिहाद’च चालू आहे. हे सर्व थांबवण्यासाठी ‘वक्फ ॲक्ट’ आणि ‘वक्फ बोर्ड’ रहित करण्यासाठी जळगाववासियांनी संघटितपणे विरोध करावा.

३. हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांना सनदशीर मार्गाने विरोध करा.



वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी !

  • वंजारी समाजाच्या बांधवांना धर्मांतरित होण्यापासून वाचवणार्‍या मातोश्री आश्रमाचे सेवेकरी सभेला आले होते.
  • भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश (राजू मामा) भोळे हे मान्यवरांसाठीच्या विशेष बैठकव्यवस्थेमध्ये न बसता धर्मप्रेमींसमवेत चटईवर बसले. त्यांनी सर्वप्रथम ‘मी हिंदु धर्माभिमानी असल्या’चे दाखवून दिले.
  • श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराचे अध्यक्ष आणि व्यावसायिक श्री. शाम कोगटा यांनी सभेच्या वातावरण निर्मितीसाठी रस्त्याच्या दुतर्फा भगवे कापड लावल्याने हिंदुत्वाची अस्मिता जागृत झाली. वक्त्यांच्या स्वागतासाठी श्री. शाम कोगटा यांनी ढोल-ताशा पथक आणि भगवा पेहराव सिद्ध करून दिला.
  • ४०० किमी दूरवरील पुणे येथून ‘समस्त हिंदु बांधव’ संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. जळगावमधील ५० ते ६० किलोमीटर दूरवरील गावांतील धर्मप्रेमी उपस्थित राहिले.
  • योगगुरु पंडित जितेंद्र शुक्ला, श्री. अजय गांधी, ह.भ.प. श्यामजी महाराज, श्री. अमित भाटिया यांनी समितीच्या कार्याचा गौरव करणारा अभिप्राय दिला.
  • जळगाव शहर मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्री. सुरेश भोळे आणि चाळीसगाव येथील भाजपचे आमदार, तसेच जळगाव जिल्हा दूध विकास संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. मंगेश चव्हाण यांनी आदल्या दिवशी पूर्वसिद्धता पाहून हिंदूंना सभेला आवर्जून उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.
  • भाजपच्या नगरसेविकेने सभेचे होर्डिंग पाहून त्याप्रमाणे स्वत: होर्डिंग सिद्ध करून शहरातील अनेक ठिकाणी लावले.
  • मोठे होर्डिंग लावण्यासाठी उद्योजक अजय गांधी, सपन झुनझुनवाला, तुषार पटेल यांसह अन्यांनीही साहाय्य केले.
  • अनेक युवकांनी ‘मी सभेमध्ये उपस्थित आहे’, असे ‘रिल्स’ आणि छायाचित्र सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केले.

हिंदु राष्ट्र स्थापनेपर्यंत अविरत कृतीशील रहाण्याचा निर्धार !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर धर्मकार्याची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील गायत्री माता मंदिरात २८ डिसेंबर या दिवशी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला उपस्थित धर्मप्रेमींनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करेपर्यंत अविरत कार्य करणार असल्याचा निर्धार केला असल्याचे उत्स्फूर्तपणे सांगितले. या बैठकीला समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले. या वेळी धर्मप्रेमींनी शहरातील ६ भागांमध्ये धर्मजागृतीचे कार्य करण्याच्या दृष्टीने साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गांची, तर ६ भागांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्याची मागणी केली.


७ जानेवारीला जळगाव येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’चे आयोजन !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेत जळगाव मधील हिंदूंवर होणार्‍या विविध आघातांच्या संदर्भात वक्त्यांनी परखड विचार मांडले. त्यात जिल्ह्यात होणारी गोतस्करी, अवैध पशूवधगृहे, गोहत्या यांसमवेत चोपडा, यावल, भुसावळ आदी तालुक्यांत चालू असलेले धर्मांतर यांविरोधात ७ जानेवारीला ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला.


उपस्थितांचे आभार !

प्रतिष्ठित

पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगावच्या महापौर सौ. जयश्री महाजन, आमदार राजू मामा भोळे, भाजपचे नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. ललित चौधरी, ओंकारेश्वर देवस्थानचे श्री. दीपक जोशी, नगरसेवक श्री. कैलास आप्पा सोनवणे

संत आणि महंत

श्रीराम मंदिर देवस्थानचे श्री. राम जोशी, ह.भ.प. मुकुंद धर्माधिकारी, श्री स्वामी नारायण मंदिराचे स्वामी नयन प्रकाशदासजी महाराज, भारताचार्य ह.भ.प. शामजी महाराज राठोड, इस्कॉन मंदिराचे चैतन्यदासजी महाराज, ब्रह्मपूर येथील गणपति मंदिराचे श्री. बाल्या महाराज

हिंदुत्वनिष्ठ आणि धार्मिक संघटना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हिंदु राष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, योग वेदांत सेवा समिती, धर्मरथ फाऊंडेशन, रौद्र शंभु फाऊंडेशन, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ


केवळ हिंदूंच्या सभांच्या वेळी नोटीस देणारे पोलीस !

सभेच्या कालावधीत कोणताही अपप्रकार झाल्यास त्याचे दायित्व हिंदूंचे असेल, हे सांगण्यासाठी सभेपूर्वी जळगाव येथील १४० हिंदुत्वनिष्ठ आणि नगरसेवक यांना पोलिसांनी ‘कलम १४९’ची नोटीस दिली होती; मात्र सहस्रोंच्या संख्येत हिंदूंचा जनसागर लोटलेला असूनही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याउलट उपस्थित मान्यवरांनी ‘सभेचे नियोजन उत्कृष्ट होते’, असे सांगितले. (पोलीस हिंदूंच्या सभांच्या वेळी हिंदुत्वनिष्ठांना नोटीस देतात; मात्र त्यांनी कधी ‘इज्तेमा’च्या कार्यक्रमाला नोटीस दिली आहे का ? हिंदूंचे खच्चीकरण करणार्‍या पोलिसांचा हिंदूंना आधार वाटेल का ? केवळ हिंदूंवरच दडपशाहीचा वापर करणारे पोलीस निधर्मी कसे ? – संपादक)


सभेला सुरक्षा पुरवण्याच्या नावाखाली सभास्थळी येणारे रस्ते जाणीवपूर्वक बंद करणारे पोलीस !

मैदानाच्या समोरील अत्यंत रहदारीची असणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती आणि सभेला चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक बंद केल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सभास्थळी येण्यासाठी लांबच्या मार्गाने यावे लागत होते.


हिंदु जनजागृती समिती सदैव कृतज्ञ आहे !

१. कार्यकर्त्यांसाठी श्री. अमित भाटिया यांनी त्यांचे पद्मावती मंगल कार्यालय ७ दिवस विनामूल्य उपलब्ध करून दिले.

२. सत्यब्रह्म भरीत सेंटरचे श्री. किरण महाजन, जोगनिया स्वीट्सचे श्री. श्याम कोगटा, मुंबई वडापावचे श्री. कृष्णा कोळी, केटरर्स श्री. अनिल जोशी, मुरली मनोहर उपाहारगृहाचे श्री. लेखराज उपाध्याय, श्री. उत्तम अण्णा चौधरी, श्रीराम मंदिर संस्थानचे ह.भ.प. मंगेश महाराज जोशी, दत्त डेअरीचे मालक श्री. विलास राणे यांनी अनेक दिवस भोजनाची व्यवस्था केली.


‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार’ या ग्रंथाचे प्रकाशन !

ग्रंथ प्रकाशन करतांना कु. रागेश्री देशपांडे, सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. सुरेश चव्हाणके आणि श्री. सुनील घनवट
ग्रंथाचे मुखपृष्ठ

हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा छायाचित्रात्मक वृत्तांत !

झंझावात हिंदुत्वाचा । हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृढनिश्चयाचा ।।

सभेला उपस्थित रहाणार्‍या जळगावच्या पालकमंत्र्यांचे आभार !

पाणीपुरवठामंत्री श्री. गुलाबराव पाटील यांचे स्वागत करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर

धरणगाव येथील लँड जिहाद रोखण्यासाठी हिंदूंना प्रेरणादायी ठरणारा सनदशीर लढा देणार्‍या ‘गायरान भूमी बचाव मंच’चा सभेच्या व्यासपिठावर सत्कार !

मंचच्या पदाधिकार्‍यांचा श्री. सुरेश चव्हाणके यांनी सत्कार केला. (‘गायरान भूमी बचाव मंच’च्या कार्यकर्त्यांनी ७ वर्षे शासनाचा पाठपुरावा घेऊन प्रशासनास गायरान भूमीवरील अतिक्रमित थडगे पाडण्यास भाग पाडले.)

मान्यवरांचे अभिप्राय !

१. रोटरी क्लबचे उपाध्यक्ष आणि उद्योजक श्री. नीलेश संघवी – सभेचे आयोजन अप्रतिम होते. हिंदु राष्ट्रासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. समितीच्या कार्यामध्ये मीही खारीचा वाटा म्हणून सहभागी होऊ इच्छितो.

२. सौ. जयश्री महाजन, महापौर, जळगाव – अशा सभा ही काळाची आवश्यकता आहे. युवा पिढीसाठी ही सभा प्रेरणादायी आहे.

३. महंत कन्हैयादासजी महाराज – लव्ह जिहाद, गोतस्करी, धर्मांतरबंदी कायदा झालाच पाहिजे. आम्ही या अभियानासाठी सिद्ध आहोत.

४. माजी महापौर सौ. सीमा भोळे आणि भाजप नगरसेविका सौ. गायत्री राणे –  धर्माच्या आस्थेसाठी अशा सभा होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

५. डॉ. (सौ.) प्रज्ञा जंगले, माजी जिल्हाध्यक्ष, प्राध्यापक संघटना – सभा उद्बोधक झाली.

६. श्री. नितीन पारगावकर, वास्तूविशारद – सभेद्वारे मुलांवर चांगले संस्कार होऊन संस्कारित आणि धर्माधिष्ठित युवा पिढी सिद्ध होईल.

७. ह.भ.प. गोपालजी देवचंद महाले – सर्व हिंदु बांधवांनी तन, मन, धन यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी संघटित व्हायला हवे.

८. श्री श्री १००८ महामंडलेश्वर ह.भ.प. सूर्यभानंदजी सरस्वती महाराज शेळगावकर – समितीचे धर्मजागृती आणि धर्मरक्षणाचे कार्य हिंदुहिताचे आहे.

९. आत्मा रामाय दास महाराज, भक्ती मार्ग संस्था (जर्मनी) महाराष्ट्र समन्वयक – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अशा सभा प्रत्येक गावात व्हायला हव्यात.

१०. अधिवक्ता भरत देशमुख, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल – सभेत वक्त्यांनी जाज्वल्य विचार मांडले. अखंड हिंदु राष्ट्र निर्माण करण्याचे आवाहन केले. याविषयी समिती आणि सर्व कार्यकर्ते यांचे हार्दिक अभिनंदन !

११. श्री. विष्णु भंगाळे, शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) जिल्हाप्रमुख – हिंदु धर्मजागृतीचे कार्य सभेच्या रूपाने होत आहे. सभेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सत्यता पोचली. यापुढेही हिंदु राष्ट्र कार्यासाठी आम्ही समितीसमवेत कार्यरत राहू.

१२. श्री. सपन झुनझुनवाला, व्यावसायिक – सभा असामान्य होती. सभेला पुष्कळ गर्दी असूनही उत्तम व्यवस्थापन होते.


संपूर्ण सभा पहा आणि इतरांनाही पाहायला द्या –

🔥 विराट हिंदु राष्ट्र-जागृती सभा 🔥
⛳ हिंदु बांधवांनो, या सभेचा अधिकाधिक प्रसार करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा …!
🙏 आजच आपल्या क्षमतेनुसार अर्पण करूया !
https://www.hindujagruti.org/hindu-rashtra-jagruti…/donate

🚩 सभेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य संपर्क करा
☎ 9552426439
🔸 https://hinduJagruti.org


रणी फडकते आमुचे भगवे निशाण ।
‘जय श्रीराम’ मुखे गर्जुनी भगव्यास देती सन्मान ।।


जळगाव येथील राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय वृत्तपत्रांनी दिलेली प्रसिद्धी !

जळगाव येथील दैनिक लोकसत्ता, लोकमत, दिव्य मराठी, सकाळ, पुण्यनगरी, देशोन्नत्ती, देशदूत, तरुण भारत, लोकशाही, जनशक्ती, साईमत, नवराष्ट्र, केसरीराज या वृत्तपत्रांनी व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देऊन सभेचा विषय समस्त जनमानसापर्यंत पोचवला. ‘दिव्य मराठी’ने जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आवृत्तींमध्येही सभेच्या वृत्ताला प्रसिद्धी दिली.

जळगाव येथील ‘आज तक’, ‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’, ‘ई.बी.एम्. न्यूज’, ‘जळगाव लाईव्ह न्यूज’, ‘जळगाव पब्लिक मिरर’, ‘जनसंवाद न्यूज’, ‘मुक्ताई वार्ता’ या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनीही सभेला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली.


देशभरातील सहस्रो हिंदूंनी घेतला थेट (लाईव्ह) प्रसारणाचा लाभ !

‘जागो हिंदु जळगाव’ या फेसबुक पेज आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ या यूट्यूब वाहिनीवरून सभेचे थेट प्रसारण करण्यात आले. ‘फेसबुक पेज’वरून देशभरातील १७ सहस्र हिंदूंनी, तर यूट्यूबच्या माध्यमातून ११ सहस्र हिंदूंनी जळगावची सभा पाहिली.


हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरून जोडलेल्या धर्मप्रेमींचे अभिप्राय ! 

  • श्री. सागर धनगर – अशी सभा पुन्हा पुन्हा व्हायला हवी. सभा अत्यंत शिस्तबद्ध होती. धर्मसेवेसाठी मी तत्पर आहे.
  •  श्री. गजानन पाटील – सभा अत्यंत चांगली झाली. मी अन्यांनाही सभा ‘ऑनलाईन’ पहाण्यास सांगितले.
  •  श्री. पवन गोटमारे (भारतीय सैन्यदल, नागालँड) – देशसेवा करण्यासाठी धर्माप्रती प्रेम असणे आवश्यक आहे.
  •  श्री. विजय कोळी, व्यवस्थापक अधिकारी, बँक ऑफ बडोदा – सभा पाहून आनंद झाला.
  •  डॉ. सारंग जोशी – सभा अत्यंत प्रभावी झाली. धर्मसेवेसाठी मी तत्पर आहे.

सभास्थळी लक्षवेधी बालकक्ष !

सभेच्या प्रवेशद्वाराजवळ क्रांतीकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण यांचे महत्त्व विषद करण्यासाठी बालसंस्कार कक्ष उभारण्यात आला होता. बालचमू क्रांतीकारक अन् पारंपरिक वेशभूषा परिधान करून घोषणा देत होते. त्यांच्या घोषणा ऐकून प्रमुख वक्ते श्री. सुरेश चव्हाणके यांच्यासह अन्य मान्यवर वक्त्यांनीही त्यांच्यासमवेत काही मिनिटे उभे राहून घोषणा दिल्या. यामुळे बालकांचा उत्साह द्विगुणित झाला.


धर्मविरोधी आघात रोखण्याच्या मागण्यांना हिंदूंकडून उत्स्फूर्तपणे भ्रमणभाषमधील ‘टॉर्च’ दाखवून अनुमोदन !

ग्रामबैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

सभेचे निमंत्रण देण्यासाठी शहरालगतच्या शिरसोली, पाळधी, लाडली, नाचणखेडा, पहूर, कानळदा, नांद्रा, आवार, धामणगाव, मन्यारखेडा, जाडगाव, बामणोद, साक्री, भुसावळ, झिपरू आण्णा नगर (नशिराबाद), पाडळसे, बेळी, बोरनार, मोहाडी, दापोरा, ममुराबाद, साकळी, धानोरा, पिंप्राळा, एकलग्न, आव्हाने, चमगाव, वराड, रिंगणगाव, पिंपरी, डोणगाव, खर्ची, पथराड, शेरी, भोद, आव्हाणे, हिंगोली, पिंपळकोठा, चिंचपुरा, निमखेडी, बाभुळगाव, वैजनाथ, सातखेडा, वंजारी, म्हसावद, हनुमानखेडा, टाकळी, टाकरखेडा, पिंपळेसिम, बांभोरी, खेडी, मुसळी, ममुराबाद आदी गावांमध्ये घेतलेल्या ग्रामबैठकांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.