कांदापात लागवड

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘हिवाळ्याच्या दिवसांत कांदापातीची (कांद्याच्या पानांची) वाढ चांगली होते. पेठेतून आणलेले कांदे मातीत लावल्यास त्याला कोंब येऊन कांदापात सहज मिळवता येते. काही वेळा घरातील कांद्यांना कोंब येऊ लागतात. असे कांदेही कुंडीत लावल्यास कांदापात (कांद्याची पाने) मिळते. पात मोठी झाल्यावर ती खुडून घ्यावी. पूर्ण रोप उपटू नये. असे केल्याने पुन्हा नवीन फुटवे (अंकुरातून येणारी पाने) येतात आणि अशा प्रकारे २ – ३ वेळा कांदापात मिळवता येते.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२३.१२.२०२२)