शिक्षणासाठी बांगलादेशात गेलेल्या हिंदु तरुणीचे मुसलमानाकडून धर्मांतर !

ढाका (बांगलादेश) – भारतातून बांगलादेशात शिकण्यासाठी गेलेली अमृता दत्ता नावाच्या तरुणीला अब्दुल नावाच्या एका बांगलादेशी मुसलमान तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह केला. विवाहानंतर अब्दुलने अमृतावर शारीरिक अत्याचार करण्यास चालू केल्यावर अमृताने बांगलादेशातील हिंदूंचे साहाय्य घेतले आहे, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या संघटनेने ट्वीट करून दिली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशासारख्या देशात शिक्षणासाठी जाणे, हेच मुळात हास्यास्पद आहे ! भारतात जेथे ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडतात, तेथे बांगलादेश मागे कसा राहिल ?