
नवी मुंबई, १७ जून (वार्ता.) – महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणार्या शिष्यवृत्ती योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रारंभ झाला आहे, अशी माहिती उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी दिली. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी ४६ सहस्र ९२८ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत कागदपत्रे अपूर्ण आणि अन्य कारणांनी त्यातील ७ सहस्र ८६४ अर्ज बाद झाले. उर्वरित ३९ सहस्र ६४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते; मात्र निवडणुकीमुळे ही प्रक्रिया लांबली. त्यानंतर शिष्यवृत्ती पाठवण्यास प्रारंभ झाला होता. १ सहस्र ५०० विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे पाठवले असतील, तोपर्यंत मध्येच विधान परिषदेची निवडणूक आली. त्यामुळे पुन्हा अडथळा आला.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !