केंद्र सरकार ‘भारत जोडो’ यात्रेला लक्ष्य करत असल्याचा काँग्रेसचा फुकाचा आरोप !

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सरकारने यात्रा थांबवण्याचे केले होते आवाहन

नवी देहली – कोविड महामारीच्या नव्या धोक्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ डिसेंबर २०२२ या दिवशी बोलावलेल्या बैठकीत काँग्रेसने समाचार घेतला. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या चिंतेवरून केंद्र सरकार ‘भारत जोडो’ यात्रेला लक्ष्य करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ काँग्रेस पक्षाने दिला आहे. या पत्रात मांडविया यांनी राहुल गांधी यांना कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, ‘ओमिक्रॉन बीएफ्.७’ या कोरोेना विषाणूचे संक्रमण झाल्याची प्रकरणे काही मासांपूर्वी समोर आली होती; परंतु पंतप्रधानांची ही बैठक ‘भारत जोडो’ यात्रा देहलीत पोचणार असतांना होत आहे.  (‘प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाच्या दृष्टीकोनातून पहाण्याची काँग्रेसची जुनी खोड काही जात नाही’, असे कुणी म्हटल्यास ते अयोग्य ठरणार नाही ! – संपादक)  ‘भारत जोडो’ यात्रा बुधवारी राजस्थानमधून हरियाणात पोचली आहे. २४ डिसेंबरला ती देहलीत प्रवेश करील.

संपादकीय भूमिका

  • ‘कुंभमेळ्यामुळे कोरोनासाचा संसर्ग वाढला’, अशी टीका करत त्या वेळी हा उत्सव बंद करण्याची मागणी निधर्मीवाद्यांनी केली होती. आता कोरोनाचा धोका पुन्हा उद्भवला असता, ‘भारत जोडो यात्रा’ बंद करण्याची मागणी निधर्मीवादी का करत नाहीत ?