लव्ह जिहादच्या विरोधात नागपुरात हिंदुऐक्याचा हुंकार !

  • ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त एकवटले सहस्रावधी हिंदू !

  • लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी !

‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त सहभागी झालेले हिंदू

नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – लव्ह जिहादच्या वाढत्या घटना आणि त्यातून होणारे धर्मांतर, आमीषे अन् बळजोरी यांमुळे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’द्वारे एकवटलेल्या सहस्रावधी हिंदूंनी महाराष्ट्रात तत्परतेने लव्ह जिहाद अन् धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी मागणी केली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विधानभवनावर हा मोर्चा काढून हिंदूंच्या अस्तित्वावर घाला घालणार्‍या या घटना रोखण्यासाठी याच अधिवेशनात हे कायदे करण्याची मागणी केली आहे.

संत, हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्षांचे आमदार, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी मोर्च्याला उपस्थित होते. विदर्भासह महाराष्ट्रातील विविध जिह्यांतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी सहस्रावधींच्या संख्येने मोर्च्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

२१ डिसेंबर या दिवशी येथील यशवंत स्टेडियम येथून हिंदु जनसंघर्ष मोर्च्याला प्रारंभ झाला. या मोर्च्यामध्ये विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या.  महिला आणि युवतीही मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. या वेळी हातात भगवे झेंडे घेऊन ‘हर हर महादेव’, ‘जय श्रीराम’ ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणा दिल्या. अधिवक्ते, कीर्तनकार, उद्योजक आदी शिस्तबंध पद्धतीने सहभागी झाले होते. मोर्चा महाराष्ट्र बँक, झाशी राणी चौक, व्हरायटी चौक, फ्रीडम पार्क मार्गे नागपूर विधान भवनाजवळ विसर्जित झाला. या वेळी लव्ह जिहादविरोधी तथा धर्मांतरबंदी कायदा करण्याचे निवेदन महाराष्ट्र सरकारला सादर करण्यात आले.

हातात घेतलेल्या फलकांद्वारे ‘हिंदु युवतींनो, लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडू नका’, ‘आफताब याला फाशी द्या’, ‘धर्मांतर हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणावे’, ‘आंतरधर्मीय विवाह नोंदणी न्यायालयात करून लव्ह जिहाद आहे का ? याची पडताळणी करण्यात यावी’, ‘लव्ह जिहादची विषवल्ली ठेचा’, ‘लव्ह जिहादसाठी होणार्‍या अर्थपुरवठ्याद्वारे होणार्‍या आतंकवादी कारवायांची चौकशी करण्यात यावी, लव्ह जिहाद आणि धर्मांतर रोखण्यासाठी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी आदी मागण्या करण्यात आल्या.

मोर्च्यात सहभागी संघटना !

या विशाल मोर्च्यात ‘वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद, अखिल भारतवर्षीय माहेश्‍वरी महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पूज्य शदानी दरबार, राष्ट्रीय युवा गठबंधन, राजपूत करणी सेना, विश्‍व सनातन संघ, नाथुराम हिंदु महासभा, अखिल विश्‍व सरयूपारिण ब्राह्मण महासंघ, वैश्य एकता परिषद, राष्ट्रीय वारकरी परिषद, राष्ट्रीय सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, पुरोहित महासंघ, धर्मवीर आध्यात्मिक आघाडी, जैन संघटना, स्वामी समर्थ संप्रदाय, श्री संप्रदाय, इस्कॉन, गायत्री परिवार, हिंदु विधीज्ञ परिषद, रणरागिणी, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती या संघटनांसह भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’, आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

आंदोलनात सहभागी राजकीय नेते !

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार श्री. भरतशेठ गोगावले, आमदार श्री. महेंद्र दळवी, आमदार श्री. महेंद्र थोरवे, भाजपचे आमदार श्री. मंगेश चव्हाण, माजी मंत्री आणि भाजपचे नेते डॉ. परिणय फुके

उपस्थित संतगण आणि मान्यवर !

विश्‍व महावीर ट्रस्टचे संस्थापक जैनमुनी पू. नीलेशचंद्र महाराज, सनातन संस्थेचे संत पू. अशोक पात्रीकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे मोर्शी येथील तालुकाध्यक्ष ह.भ.प. मनोज महाराज मिरकुटे, अग्रहरि वैश्य समाजाचे राष्ट्रीय संघटक श्री. अजय अग्रहरि, वैश्य एकता महिला परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रंजना गुप्ता, परशुराम संघटनेचे नागपूरचे अध्यक्ष श्री. वीरेंद्र कठाळे, श्री विदर्भ अमरनाथ सेवा समितीचे संयोजक श्री. उमेश बडगे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे सभापती श्री. श्यामसुदंर सोनी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव, श्री. आनंद घारे, नथुराम हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. संदीप काळे, चित्पावन ब्राह्मण संघाचे नागपूर येथील उपाध्यक्ष श्री. रानडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नागपूर जिल्हा संघटक श्री. अश्‍विन निमजे, वैश्य एकता परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रामकिशन गुप्ता, राष्ट्रीय युवा गठबंधनचे अध्यक्ष श्री. राहुल पांडे, पूज्य शदाणी दरबारचे (नागपूर) श्री. राकेश बत्रा