वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीचे धरणे आंदोलन आणि जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

वर्धा, २० डिसेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे हिंदु राष्ट्र-जागृती धरणे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी स्वीकारले. या वेळी समितीचे सर्वश्री हितेश निखार, दीपक जमनारे, अनिल कावळे, विश्वनाथप्रसाद सब्राह, सौ. तुलसी सब्राह आदी उपस्थित होत्या.