(म्हणे) ‘राज्यघटना वाचवायची असेल, तर पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी सिद्ध रहा !’

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे माजी मंत्री राजा पटेरिया यांचे चिथावणीखोर विधान

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे माजी मंत्री राजा पटेरिया

भोपाळ (मध्यप्रदेश) – पंतप्रधान मोदी निवडणूक पद्धत संपुष्टात आणतील. धर्म, जाती आणि भाषा यांच्या आधारावर देशात फूट पाडतील. त्यांच्यामुळे दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक यांचे जीवन संकटात सापडले आहे. राज्यघटना वाचवायची असेल, तर मोदी यांच्या हत्येसाठी सिद्ध रहा. हत्या म्हणजे त्यांना पराभूत करणे आहे, असे चिथावणीखोर विधान मध्यप्रदेशातील काँग्रेसचे नेते राजा पटेरिया यांनी केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात ते त्यांच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देतांना दिसत आहेत. हा व्हिडिओ राज्यातील पन्ना जिल्ह्यातील पवई येथील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओवरून राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे.

पटेरिया यांचे हास्यास्पद स्पष्टीकरण

(म्हणे) ‘माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला !’

राजा पटेरिया यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून त्यांच्या विधानाविषयी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, माझ्या पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसंबंधीच्या विधानाचा विपर्यास करण्यात येत आहे. मी म. गांधी यांना मानणारा आहे. मी अशा प्रकारचे विधान करू शकत नाही. माझा म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्टीकोनातून होता. राज्यघटना वाचवण्यासाठी मोदी यांना हरवणे आवश्यक आहे. अल्पसंख्यांक, दलित आणि आदिवासी यांच्या रक्षणासाठी बेरोजगारी दूर करण्यासाठी त्यांना पराभूत करणे आवश्यक आहे; पण माझे विधान अत्यंत चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. (जर असे असेल, तर ‘हत्या’ हा शब्द का वापरला ? जे मनात होते, तेच ओठावर आले, असेच म्हणावे लागेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

ही आहे ढोंगी अहिंसावादी काँग्रेसच्या नेत्यांची खरी मानसिकता ! अशांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !