(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)
तेहरान – इराणमध्ये अब्दुल वाहिद नावाच्या एका सुन्नी मौलवीची हत्या झाल्याचे वृत्त आहे. हत्या करण्यापूर्वी मौलवीचे अपहरण करण्यात आले होते. मृत मौलवीचा मृतदेह रस्त्याच्या कडेला झुडपात आढळून आला. मौलवी अब्दुल वाहिद यांच्या डोक्यात ३ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. इराणमध्ये शिया मुसलमान हे सुन्नी मुसलमानांपेक्षा संख्येने अधिक आहेत.
मस्जिद से इमाम को उठाया, सिर में 3 गोली मारी, लाश झाड़ियों से बरामद: ईरान में चल रहे हिजाब विरोधी प्रदर्शन के बीच मौलवियों पर हमले बढ़े#Iranhttps://t.co/KZqnNSEfqT
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 11, 2022
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना दक्षिण-पूर्व सिस्तानमधील आहे. येथे सुन्नी मौलवी अब्दुल वाहिद यांना काही काळापूर्वी एका गटाकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ८ डिसेंबर २०२२ या दिवशी इमाम हुसेन मशिदीतून मौलवी अब्दुल वाहिद याचे अपहरण करण्यात आले. मौलवीचा मृतदेह ९ डिसेंबर २०२२ या दिवशी अतिशय निर्जनस्थळी झुडपात आढळून आला. सुन्नी धर्मगुरूंच्या हत्येनंतर सिस्तान भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इराणी महिला महसा अमिनी हिचा पोलिसांच्या छळामुळे १६ सप्टेंबर २०२२ या दिवशी मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये अशांततेचे वातावरण आहे. तेथे मौलवींवर सातत्याने आक्रमणे होत आहेत. पोलीस आणि आंदोलक यांच्यात झालेल्या संघर्षात अनेकांचा मृत्यू झाला आहे.