वैचारिक आतंकवादी !

खासदार बद्रुद्दीन अजमल

संपादकीयही क्षमायाचना तोंडदेखली होती’, हे वेगळे सांगायला नको. भारतात अशी वक्तव्ये करून कुणी हिंदूंच्या भावना दुखावल्यावर त्यांच्यावर कारवाई वगैरे करण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे बद्रुद्दीन यांच्यासारख्यांचे फावते. विखारी वक्तव्ये करून जे साध्य करून घ्यायचे आहे, ते साध्य करायचे आणि वातावरण तापल्यावर क्षमायाचनेचा आव आणून वातावरण थंड करायचे, ही हिंदुद्वेष्ट्यांना लागलेली सवय आहे. बद्रुद्दीन यांच्या वक्तव्यामागील पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा हे समान नागरी कायद्याचे ते सातत्याने पाठराखण करतात. केवळ बोलणारे नव्हे, तर कृतीशील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे आसाममधील धर्मांधांची कोंडी झाली आहे. त्यातही लोकसंख्या हा विषय सध्या संवेदनशील बनला आहे. ‘भारतात लोकसंख्या कुणाची वाढते ?’, हे सर्वश्रुत आहे. ‘हम दो, हमारें दो नव्हे १’, या नियमाचे पालन हिंदु कसोशीने पाळतात; मात्र बद्रुद्दीन ज्या ‘अल्पसंख्य’ समाजातून येतात, तेथे ‘हम पाच, हमारे पच्चीस’, या तत्त्वाचे पालन केले जाते. पूर्वी हे सर्व सहन केले जात होते; मात्र आता समाज जागरूक होत असल्यामुळे मुसलमानांच्या या वृत्तीवर टीका होत आहे. त्याही पुढे जाऊन आता समान नागरी कायद्याचे वारे वाहू लागले आहेत. हा कायदा लागू झाल्यास धर्मांध मुसलमानांना ‘मुस्लिम पर्सनल लॉ’चा आधार घेत अनेक विवाह करण्याची अधिकृत संधी मिळणार नाही. त्यामुळे आतापासून भारतात याविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘आम्हीच ४ बायका करतो’, असे जरी असले, तर हिंदूही असेच आहेत; मात्र ते तसे दाखवत नाहीत’, असे सांगण्याचा तोकडा प्रयत्न बद्रुद्दीन यांच्यासारख्यांकडून केला जात आहे. सर्वधर्मसमभावाचा आधार घेत हिंदू आणि मुसलमान यांना एकाच मापात तोलण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासह हिंदुद्वेषाचा कंडही शमवून घेण्याचा हा प्रकार आहे. या घटनेकडे ‘बातमी’ म्हणून पाहून ती सोडून देण्याची चूक हिंदूंनी करू नये. हा धर्मांधांचा वैचारिक आतंकवाद आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर हिंदूंची प्रतिमा हनन करण्याचा डाव हिंदुद्वेष्ट्यांकडून रचला गेला आहे. अशी वक्तव्ये हा त्याचाच एक भाग आहे. सैन्य कारवाया करून जिहादी आतंकवाद संपुष्टात आणता येतो; मात्र वैचारिक आतंकवादामुळे जे समाजात वैचारिक प्रदूषण होते, ते दूर करण्यासाठी वैचारिक स्तरावर बरीच लढाई लढावी लागते. त्यामुळे हा आतंकवाद संपुष्टात आणण्यासाठी हिंदु धर्मातील विचारवंतांचा गट नेहमीच सिद्ध असणे आवश्यक आहे. अशांचा तात्काळ वैचारिक प्रतिवाद करून त्यांना त्यांची जागा दाखवून देता येईल. अशानेच बद्रुद्दीन यांच्यासारख्यांवर खर्‍या अर्थाने जरब बसेल !