व्हॅटिकन सिटी, ग्रीनलँड, मोनाको या देशांत एकही मुसलमान नाही !

नवी देहली – जगातील बर्‍याच देशांमध्ये इस्लामचा बोलबाला आहे. सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये इंडोनेशियानंतर (२३ कोटी १० लाख) पाकिस्तान (२१ कोटींहून अधिक) आणि भारत (२० कोटींहून अधिक) यांचा क्रमांक लागतो. भारताने लोकशाही राज्यघटना स्वीकारली असली, तरी इंडोनेशिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव हे इस्लामी देश आहेत. दुसरीकडे ख्रिस्ती धर्माचे मूळ असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये एकही मुसलमान रहात नाही. या देशाची लोकसंख्या ८०० च्या जवळपास आहे. ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’च्या अहवालानुसार व्हॅटिकनव्यतिरिक्त जगात ४७ देश आहेत जिथे एकही मुसलमान रहात नाही. या देशांमध्ये टोकेलाऊ, नियू, फॉकलंड बेट, कुक आयलंड, ग्रीनलँड, सोलोमन आयलंड, मोनाको यांसारख्या अनेक देशांचा समावेश आहे.

मुसलमानांचे सर्वाधिक प्रमाण कुठे आहे ?

‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’च्या संकेतस्थळानुसार, आफ्रिकेत ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ मॉरिटानिया’ नावाचा एक देश आहे. येथे मुसलमानांची लोकसंख्या ९९.९ टक्के आहे. याखेरीज सोमालिया (९९.८ टक्के), ट्युनिशिया (९९.८ टक्के), अफगाणिस्तान (९९.७ टक्के), अल्जेरिया (९९.७ टक्के), इराण (९९.४ टक्के), येमेन (९९.२ टक्के), मोरोक्को (९९ टक्के) आणि नायगर (९८.३ टक्के) हे मुसलमानांचे सर्वाधिक प्रमाण असलेले देश आहेत. या सूचीत पाकिस्तानचे स्थान २३ वे असून तेथे ९६.५ टक्के लोकसंख्या ही मुसलमान आहे.

कोणत्या देशांत एकही मशीद नाही ?

१. स्लोव्हाकिया

युरोपातील स्लोव्हाकिया देशात अनुमाने ५ सहस्र मुसलमान रहातात. हा देश काही वर्षांपूर्वी चेकोस्लोव्हाकियापासून वेगळा झाला. येथे मशीद बांधण्यासंदर्भात अनेक वाद झाले आहेत. वर्ष २००० मध्ये स्लोव्हाकियाच्या राजधानीत इस्लामी केंद्राच्या स्थापनेवरून वाद निर्माण झाला होता. स्लोव्हाकियामध्ये इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा नाही. ३० नोव्हेंबर २०१६ या दिवशी स्लोव्हाकियाने एक कायदा केला. त्यानंतर त्याने त्याच्या देशात इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा देणे बंद केले.

२. इस्टॉनिया

इस्टॉनिया हा दुसरा देश आहे जिथे एकही मशीद नाही. या देशात मुसलमान लोकसंख्या अत्यल्प आहे. येथेही मशीद नाही.

संपादकीय भूमिका

या देशांचे सुदैव की, तेथे भारतातील कथित धर्मनिरपेक्षतावादी नाहीत. अन्यथा त्यांनी तेथील शासनांना ‘मुसलमानविरोधी’ म्हणत मुसलमानी वस्त्या वसवण्यासाठी आकाशपाताळ एक केले असते !