असीम मुनीर पाकचे नवे सैन्यदल प्रमुख

पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणात होता हात !

पाकचे नवे सैन्यदल प्रमुख असीम मुनीर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.चे माजी प्रमुख राहिलेले लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानचे नवे सैन्यदल प्रमुख असणार आहेत. इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात मुनीर यांचा मोठा वाटा आहे.

असीम मुनीर वर्ष २०१८-२०१९ मध्ये ८ मास आय.एस्.आय.चे प्रमुख होते. सत्तेत आल्यानंतर इम्रान खान यांनी मुनीर यांची गुजरांवाला कॉर्प्स कमांडर म्हणून स्थानांतर करून स्वतःच्या जवळचे सहकारी फैज हमीद यांना आय.एस्.आय. प्रमुख बनवले होते.
मुनीर पाकचे सैन्यदल प्रमुख झाल्यानंतर भारतासमवेतच्या संबंधांमध्ये कोणतेही महत्त्वाचे पालट होण्याची शक्यता नाही उलट ते आणखी बिघडू शकतात; कारण १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथील आक्रमणामध्ये मुनीर यांचा हात होता. या आतंकवादी आक्रमणात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले होते.

संपादकीय भूमिका

  • ‘अधिकारी जितका भारतद्वेषी, तितकी त्याची उच्चपदी नियुक्ती’, असे पाकचे धोरण असते ! त्यामुळे आता भारतानेही अशा भारतद्वेषी पाकचाच नायनाट करून ही डोकेदुखी कायमची संपवावी, अशीच भारतियांची अपेक्षा आहे !