६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांनी दिलेले व्यष्टी साधनेविषयी अमूल्य दृष्टीकोन !

‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याची संधी मिळाली. त्या वेळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात दिलेले दृष्टीकोन पुढे दिले आहेत.

सौ. सुप्रिया माथूर

१. ‘अंतर्मुखता, म्हणजे सतत शिकत रहाणे !

श्रीमती अश्विनी प्रभु

२. समष्टीत रहाण्याचे लाभ

अ. समष्टी हा आरसा असून आपल्या मनाची स्थिती समष्टीच्या माध्यमातून स्पष्टपणे लक्षात येते.

आ. समष्टी म्हणजे आपले अंतर्मन !

इ. समष्टीने आपल्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू दाखवल्यास आपण विचलित होऊ नये. आपण परिस्थिती स्वीकारायला हवी आणि त्यातून शिकायला हवे.

ई. ‘आपली साधना योग्य दिशेने होण्यासाठी ईश्वराने हे सर्व दाखवले आहे. याचा गांभीर्याने स्वीकार करून कृतज्ञताभावात रहाणे’, ही पहिल्या टप्प्याची अंतर्मुखता !

उ. आपण प्रामाणिकपणे अंतर्मनाने चिंतन केल्यास आपल्याला चैतन्य ग्रहण करता येऊन आपले व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून होतात.

३. व्यष्टी साधना ही मनाची प्रक्रिया ! : व्यष्टी साधना ही मनाची प्रक्रिया आहे. त्याचा शारीरिक क्षमतेशी कसलाही संबंध नाही.

‘शारीरिक अडचणींमुळे व्यष्टी साधना झाली नाही’, असे सांगणे, म्हणजे सहानुभूती मिळवणे, तसेच सवलत घेणे आहे. काहीही अडचण असली, तरी ती व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगून त्यात सांगितल्यानुसार प्रयत्न करायला हवेत.’

– श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०२२)