‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला याच्या निषेधार्थ फेरी !

‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने काढण्यात आलेली फेरी

बेळगाव – ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला याच्या निषेधार्थ फेरी काढण्यात आली. या फेरीत महिला आणि पुरुष यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. ‘आय.एम्.ई.आर्.’ महाविद्यालयापासून या फेरीचा प्रारंभ झाला आणि ‘आर्.पी.डी. सर्कल’ येथे फेरीची समाप्ती झाली. फेरीत महिलांनी ‘जस्टिस फॉर श्रद्धा’, असे फलक धरले होते. फेरीच्या समारोपप्रसंगी ‘हिंदूंनी अशा घटनांपासून मुलींना जागृत करून त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. ही परिस्थिती उद्या आपल्या दारात येऊ शकते’, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. यानंतर ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’, करण्यात यावा, या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आले.

या प्रसंगी ‘हमारा देश’ संघटनेचे श्री. व्यंकटेश शिंदे, सौ. सुनीता पाटणकर, सर्वश्री किशोर काकडे, संतोष कागवाडे, संदीप भिडे, लक्ष्मीकांत कोटगी, टी. विजयकुमार, मधु मेणसे, पवन जोशी, अजित पाटील, मल्लिकार्जुन कोकणी यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.