सीहोर (मध्यप्रदेश) येथे मुसलमान तरुणाने दलित हिंदु तरुणीला दुसर्‍या मजल्यावरून फेकले !

बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर कृत्य !

प्रतिकात्मक छायाचित्र

सीहोर (मध्यप्रदेश) – येथे एका दलित हिंदु तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी स्थानिक लोकांनी सोहेल याला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. सोहेलने या तरुणीला इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरून खाली फेकून दिले. यात ही तरुणी घायाळ झाली. तिला उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

५ मासांपूर्वी सोहेल याने या तरुणीवर तिच्या घरात घुसून बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो सतत तिला भ्रमणभाष करून त्रास देत होता. त्याने या तरुणीला इंदूर-भोपाळ महामार्गावरील अतिथी उपाहारगृहात भेटण्यासाठी बोलावले होते. तेथे त्याने तिला हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावरील एका खोलीत नेऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी हॉटेलमधील अन्य लोकांना तिच्या ओरडण्याच्या आवाज आल्यावर ते खोलीत पोचले असता सोहेलने या तरुणीला इमारतीवरून खाली फेकून दिले.

संपादकीय भूमिका

‘दलित-मुसलमान भाई भाई’ म्हणणारे याविषयी बोलतील का ?