सिंहभूम (झारखंड) येथे हिंदु नेत्याची अज्ञातांकडून हत्या

प्रतिकात्मक छायाचित्र

सिंहभूम (झारखंड) – येथील चक्रधरपूर भागात हिंदुत्वनिष्ठ नेते कमलदेव गिरि यांची पेट्रोल बाँब फेकून हत्या करण्यात आली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. या वेळी ३ सहस्रांहून अधिक जण गोळा झाले होते. या वेळी दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्याने पोलिसांनी लाठीमार केला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यानंतर येथे धडक कृती दलाला पाचारण करण्यात आले. सध्या येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

१. हत्येची घटना येथील भारत भवन परिसरात घडली. तेथे कमलदेव हे त्यांचे मित्र शंकर सिंह यांच्यासमवेत उभे होते. त्या वेळी तेथे ३ जण आले आणि कमलदेव यांच्या मानेवर वार केले. यामुळे ते खाली पडल्यावर आक्रमणकर्त्यांनी कमलदेव यांच्यावर २ पेट्रोल बाँब फेकले आणि पळून गेले.

२. भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, हेमंत सोरेनजी, तुमच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे झारखंडच्या लोकांमध्ये संताप आहे.

संपादकीय भूमिका

  • झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! भारतात कधी मुसलमान किंवा ख्रिस्ती नेत्यांची हत्या झाल्याचे ऐकले आहे का  ?