भारतातून निर्यात करणारी ९५ टक्के आस्थापने हलाल प्रमाणपत्रधारक !  

मुंबईमध्ये ‘हलाल शो इंडिया’चे आयोजन करणार्‍या ‘ब्लॉसम मिडिया’ची माहिती

मुंबई, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘हलाल प्रमाणपत्रामुळे भारतात हलाल प्रमाणपत्र देणारी आस्थापने कोट्यवधी रुपये कमवतात. हे पैसे कुठे वापरले जातात, याचा ‘रेकॉर्ड’ आमच्याकडे नाही. त्याचा हिशोब ती आस्थापनेच ठेवतात. निर्यात करणार्‍या भारतातील ९५ टक्के आस्थापनांकडे हलाल प्रमाणपत्र आहे’, अशी माहिती ‘ब्लॉसम मिडिया’च्या प्रतिनिधीने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. या वेळी त्यांनी स्वत:चे नाव सांगण्यास नकार दिला. अरब देशांमध्ये निर्यात करून भारतातील आस्थापने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक लाभ मिळवतात. पतंजलि, डाबर या आस्थापनांनीही हलाल प्रमाणपत्र घेतले आहे, यातून तुम्ही काय ते समजा. मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ कार्यक्रम रहित झाला असला, तरी आम्ही अन्य गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करू. देशात अन्यत्र ‘हलाल शो इंडिया’सारखा कार्यक्रम घेण्याचा आमचा विचार नाही’, असेही ‘ब्लॉसम मिडिया’च्या प्रतिनिधीने या वेळी सांगितले. ‘पोलिसांकडून आपणाला कोणती नोटीस आली आहे का ?’, याविषयी विचारले असता तशी कोणतीही नोटीस आली नसल्याचे सांगितले.

आतकंवादाला होणार्‍या अर्थपुरवठ्याविषयीच्या आरोपासंदर्भात बोलणे टाळले !

या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ‘हलाल प्रमाणपत्र देणार्‍या इस्लामी संघटना आतंकवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा करत असल्याचा आरोप होत आहे, त्याविषयी आपली भूमिका काय आहे ?’, असे विचारले असता ‘ब्लॉसम मिडिया’च्या प्रतिनिधीने याविषयी बोलणे टाळले. (याविषयी अन्वेषण यंत्रणांनी चौकशी करणे अपेक्षित आहे. – संपादक)

संपादकीय भूमिका

  • भारतात खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देण्यासाठी ‘एफ्.एस्.एस्.आय्.’ आणि ‘एफ्.डी.ए.’ या शासनमान्य संस्था असतांना देशातून निर्यात करण्यासाठी अन्य स्वयंघोषित संस्थांचे प्रमाणपत्र लागणे, ही एक प्रकारे केंद्र सरकारला समांतर निर्माण झालेली व्यवस्था होय !
  • हे राष्ट्राच्या दृष्टीने चिंताजनक आहे. याचे गांभीर्य वेळीच ओळखून सरकारने यावर बंदी आणायला हवी !