(म्हणे) ‘अब्दुल सत्तार हिंदु धर्माचे पुरस्कर्ते !’

  • कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण

  • कशाचेही खापर हिंदु धर्मावर फोडून स्वतःची बौद्धीक दिवाळखोरी प्रकट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड

  • इस्लाममध्ये स्त्रियांचा आदर केला जात असल्याचे विधान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई – इस्लाममध्ये स्त्रियांचा किती आदर केला जातो; मात्र मनुवादामध्ये स्त्रियांना हीन लेखले आहे. अब्दुल सत्तार हे हिंदुत्वाचे नवीन पुरस्कर्ते आहेत, अशी हिंदु धर्माविषयीची गरळओक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीसमोर प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना अश्‍लाघ्य शिवी दिली. याविषयी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना आव्हाड यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

आव्हाड पुढे म्हणाले की, अब्दुल सत्तार यांना हिंदु धर्मात प्रवेश देणार असतील, तर आमची ‘ना’ नाही. सत्तार ज्या धर्मातून येतात, त्यामध्ये महिलांचा किती सन्मान केला जातो, हे मुल्ला-मौलवी यांना विचारून पहावे. महिलेला अपमानित करणे इस्लाममध्ये अमान्य आहे. अब्दुल सत्तार इतका कट्टर मनुवादी आतापर्यंत महाराष्ट्रात झाला नाही.

संपादकीय भूमिका

  • इस्लाममधील स्त्रियांच्या सन्माची भाषा करणारे जितेंद्र आव्हाड यांना इस्लाममधील ‘खतना’, ‘हलाला’, ‘तलाक’, ‘बुरखा’, ‘हिजाब’ या पद्धती काय स्त्रियांच्या सन्मानाच्या गोष्टी वाटतात का ?