भाजी विक्रेता शहरयार मिर्झा याने ८ वर्षांच्या मुलीवर केला बलात्काराचा प्रयत्न !

प्रतिकात्मक छायाचित्र

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे एका ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणारा ५० वर्षीय भाजी विक्रेता शहरयार मिर्झा याला अटक करण्यात आली. तो पीडितेच्या घराजवळ भाजी विकायला आला होता. ती एकटी खेळत असल्याचे पाहून वासनांध मिर्झाने तिला उचलून जवळच्या झाडीत नेले. हे तेथील एका महिलेने पाहून आरडाओरडा केला. यावर लोक एकत्र जमले. या घटनेची माहिती मिळताच हिंदु जागरण मंचाचे कार्यकर्तेही घटनास्थळी पोचले. त्यांनी मुलीला मिर्झाच्या कचाट्यातून सोडवले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलीला अनेक ठिकाणी जखमा झाल्या असून तिच्यावर उपचार चालू आहेत. मुलीचा जबाब नोंदवण्यात आला असून मिर्झाच्या विरोधात ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिर्झा येथील हिना कॉलनी येथे रहातो.

संपादकीय भूमिका

  • अल्पसंख्य असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !