हलाल प्रमाणपत्राची सक्ती केंद्रशासनाने थांबवावी ! –  प्रवीण कानविंदे, अध्यक्ष, गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट

मुंबई, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – कोणत्याही उत्पादनाला परदेशात असणारी मागणी ही त्या उत्पादनाच्या चांगल्या दर्जावरून ठरत असते. भारतात मात्र हलाल प्रमाणपत्राची सक्ती अयोग्य आहे. भारतात असे प्रकार होऊ नयेत. हलाल प्रमाणपत्राची सक्ती केंद्रशासनाने थांबवावी, असे आवाहन ‘गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे यांनी केले.

हलाल पदार्थ आणि वस्तू यांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबईतील इस्लामिक जिमखाना येथे होऊ घातलेल्या ‘हलाल शो इंडिया’ या कार्यक्रमाला प्रशासनाने अनुमती देऊ नये, याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.