तेलंगाणात सत्ताधारी भारत राष्ट्र समितीच्या ४ आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न उघड केल्याचा पोलिसांचा दावा : ३ जणांना अटक

भाग्यनगर (तेलंगाणा) – सत्ताधारी भारत राष्ट्र समितीच्या ४ आमदारांना विकत घेण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे, असा दावा येथील सायबराबाद पोलिसांनी केला आहे. या तिघांकडून रोख रक्कम आणि धनादेशही जप्त करण्यात आले आहेत. सायबराबादचे पोलीस आयुक्त स्टीफन रवींद्र म्हणाले की, आमदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी किंवा त्याहून अधिक रुपयांचा सौदा झाला असता.

या प्रकरणी भारत राष्ट्र समितीचे प्रवक्ते कृष्णक यांनी सांगितले की, आमचे आमदार विकले जाणार नाहीत. आमच्या ज्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यात गुववाला बलराजू, बिरम हर्षवर्धन, पायलट रोहित रेड्डी आणि रेगा कांथा राव यांचा समावेश आहे.