उसाला पहिली उचल अडीच सहस्र रुपये करण्याची संघर्ष समितीची मागणी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – या वर्षीच्या हंगामात उसाला पहिली उचल अडीच सहस्र रुपये घोषित करावी आणि अंतिम भाव ३ सहस्र १०० रुपये द्यावा, अशी मागणी ऊसदर संघर्ष समितीने केली आहे. या मागणीसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत परिसरात चालू असलेली ऊसतोड रोखली, तसेच ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर मालकांनाही ऊस वाहतूक न करण्याविषयी आवाहन केले. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम चालू झाला आहे; मात्र जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अद्याप उसाची पहिली उचल घोषित केलेली नाही.