६६ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिने तिच्या ११ व्या वाढदिवसानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लिहिलेले पत्र !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. श्रिया राजंदेकर

गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर),

माझ्या वाढदिवसाला आपल्या कोमल श्री चरणी शिरसाष्टांग नमस्कार !

१. हे गुरुदेवा, तुम्हाला माझ्या मनाची स्थिती ठाऊक आहेच.

अ. मी दिवसभर जेव्हा तुमचे स्मरण करते, तेव्हा तुम्ही माझ्या समवेतच असता आणि त्या वेळी तुम्ही माझे मन अखंड निर्विचार स्थितीत ठेवता.

आ. ‘माझ्या मनात अनेक विचार येतात. तेव्हा तुम्ही ते विचार नष्ट करून मला अलगदपणे निर्विचार स्थितीत घेऊन जाता आणि ‘मी त्या निर्विचार स्थितीत कधी गेले’, हे तुम्ही मला कळूही देत नाही.

२. गुरुदेवा, आपल्या श्री चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच पडेल. हे गुरुदेवा, मला तुम्ही दिवसभरात अनेक वेळा वरील अनुभूती देता. ती अनुभूती मला तुमच्याच कृपेने येते.

३. हे गुरुदेवा, दिवसभर तुम्ही मला माझ्या चुकांची जाणीव करून देता.

४. मी ज्या चुका करते, त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करता आणि ‘मी साधनेसाठी अजून कसे प्रयत्न करू शकते ? ते देवाला अपेक्षित असे कसे होतील ?’, हेही तुम्ही मला सांगता.

५. गुरुदेवा, तुम्ही माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करता. ‘मी काही मागायच्या आधीच तुम्ही मला इतके भरभरून देता की, तुम्ही मला देता तितके साधनेचे प्रयत्न मी करत नाही’, असे मला वाटू लागते.

६. ‘गुरुदेवा, माझ्यात अनेक स्वभावदोष आहेत. ते तुम्हीच नष्ट करणार आहात आणि मला लवकरात लवकर तुमच्या चरणी घेऊन जाणार आहात’, असे मला वाटते.

७. हे गुरुदेवा, मी काहीच करू शकत नाही, तरी माझ्या मनात केवळ आणि केवळ तुमचेच नाम असू दे.

८. ‘गुरुदेवा, माझ्या मनात तुम्हाला सोडून अजून कुठलाही विचार येऊ देऊ नका’, हीच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या कोमल श्री चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.

– आपले छोटेसे फूल,

कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ११ वर्षे), फोंडा, गोवा. (३०.४.२०२२)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना लिहिलेल्या पत्रातील कु. श्रिया राजंदेकर हिचे सुबक आणि सुंदर हस्ताक्षर