तक्रार घेऊन आलेल्या महिलेला कर्नाटकातील भाजपच्या मंत्र्याने मारले कानफाटात !

कर्नाटकातील भाजपचे मंत्री महिलेला कानफाटात मारताना (डावीकडे)

बेंगळुरू – कर्नाटकच्या भाजप सरकारमध्ये असलेले मंत्री व्ही. सोमण्णा यांच्या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या व्हिडिओमध्ये सोमण्णा यांच्याकडे तक्रार घेऊन आलेल्या महिलेला ते कानफाटात मारत असल्याचे दिसत आहे. त्यानंतरही संबंधित महिला ही त्यांचे पाय पकडून ‘मला साहाय्य करावे’, अशी विनवणी करत आहे. ही घटना २२ ऑक्टोबर या दिवशी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट तालुक्यात घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सौजन्य : TIMES NOW

हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर काँग्रेसने भाजपचा निषेध नोंदवला आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार रणदीपसिंह सुरजेवाला यांनी ट्वीट केले, ‘‘कर्नाटकचे मंत्री आणि भाजपचे नेते यांच्या डोक्यावर सत्तेचा अहंकार चढला असून तो बोलत आहे !’’

संपादकीय भूमिका

  • जनतेच्या प्रश्‍नांविषयी नेत्यांमध्ये असलेल्या असंवेदनशीलतेचेच हे प्रतीक होय ! या घटनेचे अन्वेषण करून कर्नाटकातील भाजप सरकारने संबंधित मंत्र्यावर कारवाई करावी, ही अपेक्षा !