पंजाबला मागे टाकत ‘अमली पदार्थांची राजधानी’ बनत आहे केरळ राज्य !

राज्यपाल आरिफ महंमद खान यांचा गंभीर दावा

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान

थिरूवनंतपूरम् – केरळ राज्यात अमली पदार्थांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत असून ते पंजाबला मागे टाकत ‘ड्रग्ज कॅपिटल’ (अमली पदार्थांची राजधानी) बनण्याच्या दिशेने झपाट्याने मार्गक्रमण करत आहे, असा गंभीर आरोप केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी केला आहे. ते एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी बोलत होते.

खान पुढे म्हणाले की…

१. लॉटरी आणि मद्य हे या दक्षिण भारतीय राज्यांच्या महसुलाचे दोन मुख्य स्त्रोत आहेत. १०० टक्के साक्षर असलेल्या केरळसाठी ही लज्जास्पद गोष्ट आहे.

२. जिथे अन्य राज्ये मद्यावर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तिथे केरळ सरकार त्याला प्रोत्साहन देण्यामध्ये गुंतले आहे.

३. लॉटरीचे तिकिट केवळ गरीब लोक खरेदी करतात. केरळ सरकार त्यांची लूट करत आहे. सरकार जनतेला मद्याच्या आहारी नेत आहे.

संपादकीय भूमिका

  • खान यांच्या आरोपांचे अन्वेषण होऊन त्यात गुंतलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
  • साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या केरळमध्ये दुसरे काय घडणार ? यावर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे लक्षात घ्या !