परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेले विविध दृष्टीकोन

साधकांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

कु. गीता चौधरी यांनी स्वयंपाकघर, स्वागतकक्ष आणि आश्रमसेवांचे नियोजन या विविध सेवा केल्या आहेत. या सेवा करत असतांना त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वेळ आणि शक्ती वाचवणे

कु. गीता चौधरी

१. स्वच्छता करतांना आम्ही पूर्वी सामानावर कापड झाकत नसू. यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘सामानावर कापड झाकल्यास त्यावरील धूळ झटकून ते स्वच्छ केले, तरी चालते, नाहीतर सगळ्या वस्तू स्वच्छ करण्यात आपला वेळ आणि शक्ती व्यय होते.’’

२. एकदा शेणाने सारवलेल्या जागी एक बालसाधक सायकल चालवत होता. ते पाहून परात्पर गुरु डॉक्टरांनी निरोप पाठवला, ‘‘सायकलच्या टायरला शेण लागेल आणि भूमीही पुन्हा सारवावी लागेल. यात पुन्हा साधकांचा वेळ आणि शक्ती वाया जाईल.’’

– कु. गीता चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (मे २०१६)