‘त्यांच्या’वर संपूर्ण बहिष्कार घाला !
नवी देहली – तुम्ही कुठेही ‘त्यांना’ पहाल, तेव्हा त्यांचे डोके ठिकाणावर आणले पाहिजे. यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे त्यांच्यावर संपूर्ण बहिष्कार ! तुम्ही याच्याशी सहमत आहात का ? जर तुम्ही सहमत असाल, तर हात उंचावून माझ्या समवेत म्हणा ‘आम्ही ‘त्यांच्यावर’ संपूर्ण बहिष्कार घालतो. आम्ही त्यांच्या दुकानातून कोणताही साहित्य खरेदी करणार नाही. आम्ही त्यांना रोजगार देणार नाही, असे आवाहन भाजपचे देहलीतील खासदार प्रवेश वर्मा यांनी येथे आयोजित विराट हिंदु महासभेत कुणाचेही नाव न घेता केले. तथापि हे आवाहन मुसलमानांच्या विरोधात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे; मात्र स्वतः खासदार प्रवेश वर्मा यांनी हे नाकारले आहे. ही सभा मनीष यांच्या हत्येच्या विरोधात आयोजित करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणी साजिद, आलम, बिलाल, फैजान, मोहसीन आणि शाकिर यांना अटक करण्यात आली आहे.
सुदर्शन की मुहिम दंगाईयों का #आर्थिक_बहिष्कार को मंच से उठाया सांसद पर प्रवेश वर्मा ने, बोले हत्यारों का पूर्ण रूप से आर्थिक बहिष्कार होना चाहिए। @p_sahibsingh @BJP4Delhi #BindasBol
pic.twitter.com/Ee067W8rTn— Suresh Chavhanke “Sudarshan News” (@SureshChavhanke) October 9, 2022
खासदार वर्मा म्हणाले की, नुकतेच देहलीमध्ये सुंदरनगरी येथे मुसलमानांकडून मनीष नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली. मी त्याची हत्या करणार्यांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. अशांचे उपाहारगृह असेल किंवा अन्य कोणताही व्यवसाय असेल, त्याच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. जोपर्यंत सर्व हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशा घटना घडतच रहाणार. जिहादी लोक देहलीत अशा घटना घडवतात, त्यांना वाटते की, येथे त्यांचे सरकार आहे. अशा लोकांना हिंदू आणि पोलीस दोघेही २४ घंट्यांत धडा शिकवू शकतात. त्यासाठी बहिष्कार घातला पाहिजे. हे लोक हातगाड्या लावतात, त्यांच्याकडून भाजी विकत घेण्याची आवश्यकता नाही. यांचे मांस आणि मासे विक्रीची दुकाने, तसेच उपाहारगृहे आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेला सांगितले पाहिजे. ज्यांच्याकडे परवाने नाहीत अशी दुकाने बंद केली पाहिजेत. जेथे ते दिसतील त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे.