अणूयुद्धाची शक्‍यता जलद गतीने वाढत आहे ! – उद्योगपती इलॉन मस्‍क

डावीकडे प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्‍क

मॉस्‍को (रशिया) – ‘अणूयुद्धाची शक्‍यता जलद गतीने वाढत आहे’, असे ट्‍वीट प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्‍क यांनी केले आहे. यामुळे पुन्‍हा एकदा जगात अणूयुद्धाच्‍या चर्चेला बळ मिळाले आहे. मॅक्‍स टेगमार्क नावाच्‍या एका ट्‍विटर खात्‍यावर करण्‍यात आलेल्‍या ट्‍वीटवर उत्तर देतांना मस्‍क यांनी हे विधान केले आहे.

मॅक्‍स टेगमार्क यांनी लिहिले आहे, ‘मला वाटते की, जगात अणूयुद्धाची शक्‍यता आहे.’ या संदर्भात त्‍यांनी एक तक्‍ता प्रसारित केला आहे. त्‍यात रशिया युक्रेनवर अणूबाँब टाकण्‍याची शक्‍यता ३० टक्‍के वर्तवण्‍यात आली आहे. जर असे झाले, तर ‘नाटो’ देश रशियाच्‍या विरोधात युद्धात उतरतील, अशी ८० टक्‍के शक्‍यता आहे. यातूनच पुढे तिसरे महायुद्ध होण्‍याची शक्‍यता ७० टक्‍के आहे.