थायलंडमध्ये बाल संगोपन केंद्रातील गोळीबारात २२ मुलांसह ३२ जण ठार

बँकॉक (थायलंड) – थायलंडच्या नोंग बुआ लाम्फू प्रांतातील एका बाल संगोपन केंद्रात ६ ऑक्टोबर या दिवशी एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात, तसेच चाकूच्या आक्रमणात ३१ जणांचा बळी गेला. यात २२ लहान मुलांसह २ शिक्षक आणि एक पोलीस यांचा समावेश आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार ३४ वर्षीय पन्या कामराब नावाच्या माणसाने हा गोळीबार केला. त्याचा अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्यावरून त्याची पोलीसदलातून हकालपट्टी करण्यात आली होती. गोळीबारानंतर तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.