भदोही (उत्तरप्रदेश) येथील दुर्गापूजा मंडपात आरती चालू असतांना लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू

एकूण ५५ जण होरपळले !

भदोही (उत्तरप्रदेश) – येथील एका दुर्गापूजा मंडपाला २ ऑक्टोबरच्या रात्री आग लागून झालेल्या अपघातात ५५ जण होरपळले. यांतील ३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ मुले आणि एक महिला यांचा समावेश आहे, अशी माहिती भदोहीचे जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी दिली.

आग लागली तेव्हा आरती चालू होती. त्या वेळी मंडपात जवळपास १५० जण उपस्थित होते. आग लागल्यानंतर जवळपास २० मिनिटांनी अग्नीशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. यानंतरही बराचवेळ आग आटोक्यात आली नव्हती. आग ‘शॉर्टसर्किट’मुळे लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आगीत होरपळलेल्यांना तातडीने स्थानिकांच्या साहाय्याने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.