शाहजहानने ताजमहाल बांधल्याचा वैज्ञानिक पुरावा नाही !

सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

डॉ. रजनीश सिंह (डावीकडे) ताजमहाल (उजवीकडे)

नवी देहली – ताजमहालचा इतिहास जाणून घेण्यासाठी डॉ. रजनीश सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यांनी या याचिकेत ‘शाहजहानने ताजमहाल बांधल्याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नसल्याचे सांगत याविषयी सत्य माहिती मिळवण्यासाठी ‘सत्य शोध समिती’ स्थापन करावी’, अशी मागणी केली आहे. ताजमहालविषयी इतिहासात वर्णन केलेल्या अनेक गोष्टी आहेत; परंतु ते सिद्ध करण्यासाठी अद्याप कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत, असेही डॉ. रजनीश सिंह  यांनी या याचिकेत म्हटले आहे.

यापूर्वी डॉ. रजशीश सिंह यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून ताजमहालच्या तळघरातील खोल्या उघडून सत्य आणि तथ्य शोधण्याची मागणी केली होती; मात्र त्यांची याचिका फेटाळण्यात आली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला डॉ. रजनीश सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.