भूत उतरवण्याच्या नावाखाली महिलेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या मौलानाचा मृतदेह जंगलात आढळला

मौलाना अताउल्ला कासमी

भोपाळ – मध्यप्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील जंगलात २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी मौलाना अताउल्ला कासमी याचा मृतदेह सापडला. एका महिलेशी अश्‍लील वर्तन केल्यामुळे मौलानाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या हत्येतील आरोपींचा बजरंग दलाशी संबंध असल्याचे पोलिसांनी नाकारले आहे.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौलाना अताउल्ला कासमी भूत उतरवण्याचे काम करत होता. शिवशंकर नावाच्या व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील एका महिलेची प्रकृती खालावल्याने तिला मौलाना कासमी याच्याकडे नेले होते. भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली मौलानाने महिलेशी अश्‍लील वर्तन केले. त्यानंतर २१ सप्टेंबरपासून तो बेपत्ता होता. २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी शहडोल जिल्ह्यातील पद्मानिया गावाच्या जंगलात अताउल्ला खान कासमी याचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शिवशंकर नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.