इंदूर (मध्यप्रदेश) – बजरंग दलाच्या चेतावणीनंतरही इंदूरमधील गरबा मंडपात ७ मुसलमान तरुणांनी स्वतःची ओळख लपवून प्रवेश केला आणि मुलींचे गरबा करतांनाचे व्हिडिओ बनवले. यानंतर व्यवस्थापकांनी त्या तरुणांना पोलिसांच्या कह्यात दिले. अन्वेषणानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. (हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवणारे धर्मांध ! – संपादक)
गरबा पंडाल में पहचान छिपाकर घुसे मुस्लिम युवक, हिंदू युवतियों की बना रहे थे वीडियो: इंदौर से अहमदाबाद तक पिटाई#Garba #Indore #Ahmedabad https://t.co/PMSaNZYtwu
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 29, 2022
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, पंढरीनाथ चौकातील गरबा मंडपात ७ मुसलमान तरुणांनी स्वतःची ओळख लपवून प्रवेश केला. ते मुलींचे गरबा करतांनाचे व्हिडिओ बनवत होते आणि छायाचित्रे काढत होते. त्यांची कृती पाहून तेथे उपस्थित असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर संशय आला. त्यांनी त्यांचे नाव विचारले आणि ओळखपत्र दाखवण्यात सांगितले. सर्व तरुणांनी त्यांची नावे चुकीची सांगितली आणि त्यांना ओळखपत्रही दाखवता आले नाही. यानंतर त्या तरुणांना पकडून पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. या सर्वांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.