अद्याप ‘रझा अकादमी’ ही आंतकवादी संघटना शिल्लक आहे ! – आमदार नीतेश राणे, भाजप

मुंबई, २८ सप्टेंबर (वार्ता.) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घालणे, ही काळाची आवश्यकता होती. त्याच धर्तीवर काम करणारी रझा अकादमी ही आतंकवादी संघटना शिल्लक आहे. सर्वांना मिटवून टाका. हा आमचा भारत आहे, या शब्दांत भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी ‘रझा अकादमी’ या संघटनेवरही बंदी घालण्याची मागणी ट्वीटद्वारे केंद्र सरकारकडे केली.