काश्मीरमध्ये जैश-ए-महंमदचे २ आतंकवादी ठार

कुलगाम (जम्मू काश्मीर) – येथील अहवाटू गावात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या दोघा आतंकवाद्यांना ठार मारले. महंमद शफी गनी आणि महंमद आसिफ वानी उपाख्य यावर अशी ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावे आहेत.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवाद्यांना केवळ ठार मारून काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांच्या निर्मात्या पाकलाच नष्ट करणे आवश्यक !