‘कोरोना’ महामारीच्या काळात नामजप करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘ॐ नमः शिवाय ।’ हे नामजप करतांना श्री नवदुर्गादेवी अन् सनातन संस्थेच्या तीन गुरूंचे स्मरण होणे

श्री. श्रीराम खेडेकर

‘कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आपत्काळात आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव या देवतांचा नामजप करण्यास प्रारंभ झाला. ज्या वेळी मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, परात्पर गुरु डॉक्टर आठवले, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या त्रिमूर्तींची प्रतिमा समोर ठेवून नामजप करण्यास प्रारंभ करतो, तेव्हा वेगळ्याच देवता दिसू लागतात. श्री दुर्गादेवीच्या पहिल्या जपात श्री नवदुर्गादेवी, दुसर्‍या जपात श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि तिसर्‍या वेळी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची आठवण होते, तसेच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘ॐ नमः शिवाय ।’, हे जप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण होत असते.

(कोरोना प्रतिबंधक नामजप – ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री गुरुदेव दत्त । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमः शिवाय ।’)

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी कुलदेवतेचे दर्शन होणे

विशेष म्हणजे ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ या नामजपाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या छायाचित्रावर लक्ष जायचे, तेव्हा त्यात मला माझी कुलदेवता महालसादेवी दिसायची. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाचा त्याग करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे ईश्वरीकार्यात पूर्णपणे जीवन समर्पित केले आहे; म्हणूनच त्या सर्व साधकांच्या माताच झाल्या आहेत’, अशीच ती अनुभूती आहे.’

– श्री. श्रीराम खेडेकर, नागेशी, गोवा. (४.१०.२०२१)